Posts

Showing posts from May, 2025

केज शहर अपघातमुक्त होणार का?

 केज शहर अपघातमुक्त होणार का?                                  काल दुपारी शहरात अपघाताची जी घटना घडली ती अतिशय संतापजना होती. मीना प्रवीण घोडके या महिला जागीच ठार झालेल्या असून १९ लोक यामध्ये जखमी झालेले आहेत. या घटनेपासून काय धडा मिळाला याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. केज सिटी मध्ये राहणाऱ्या व आजुबाजूच्या खेड्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, की आपली वाहने रोडवरती उभी राहायला नकोत. शहरात अनेक ठिकाणी प्रशासकीय जागा रिकाम्या आहेत शक्यतो तेथे आपली गाडी पार्क करावी. सद्या जरी फूटपाथची व्यवस्था नसली तरी नवीन बनवलेल्या नाल्यावरून चालावे. नागरिकांनी मुख्य रोडवरून शक्यतो चालणे टाळावे.  ही झाली नागरिकांबाबतची सजगता. परंतु याठिकाणी अनेक छोटे व्यापारी मग ते फळगाडेवाले असतील रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकणारा असेल असे अनेक व्यापारी आहेत जे मुख्य रोडवर आपला व्यवसाय करतात, त्यांनी नालीच्या मागे बसून आपला व्यवसाय करावा. नालीवरून चालणाऱ्याना कुठलाही त्रास होणार नाही या...

मद्यधुंद कंटेनर ड्रायव्हरचा केज शहरात धुमाकुळ! चिरडून महिला जागीच ठार. अनेकजण जखमी

 मद्यधुंद कंटेनर ड्रायव्हरचा केज शहरात धुमाकुळ! चिरडून महिला जागीच ठार. अनेकजण जखमी  आज दुपारी मातेफिरू कंटेनर ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत फिल्मी स्टाईलने केज शहरासह डोणगाव टोल नाका ते लोखंडी सावरगाव दरम्यान अनेकांना चिरडले. गाडी नंबर डीडी ०१ झेड ९७७१ असा असून यामध्ये १९ ते २० लोक गंभीर जखमी झाले आहेत. एक महिला जागीच ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. ठार झालेली महिला मीना प्रवीण घोडके या टाकळी गावच्या रहिवासी असल्याचे समजते.  याच कंटेनरने धडक देत श्रद्धा चिंचकर (येवता) यांना दहा ते पंधरा फूट सिमेंट रोड वरती घासत नेले. या तरुणीस अंबाजोगाई येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. याच प्रमाणे बळीराम पांचाळ धाकेफळ, आशालता मुंडे चारधारी, सिद्धेश्वर शिंदे पिंपरी, शेषेराव चंदनशिव शिरपूर, फुलाबाई सावंत सुगाव, बेबी देशमुख बोरिसावरगाव, श्रीकृष्ण कापरे कापरेवाडी, कुमार गायकवाड देवगाव तसेच युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित कॉन्स्टेबल शिंदे आदी अपघातात गंभीर जखमी झाले असून अंबाजोगाई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सविस्तर माहिती अशी आहे की  डोणगाव टोल नाक्यावर का...