Posts

Showing posts from December, 2024

ढेकळफेकी

 गेली काही दिवस खुप धावपळीत गेली. महिन्याभरापूर्वी पुण्याला मित्राचे लग्न होते. तिकडे गेल्यामुळे आर्थिक गणिते बिघडली. दुकान बंद केल्यामुळे अनेक ग्राहक तुटले. तसेही सिमकार्ड विक्री हा धंदा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो काही भाजीपाला नाही जो दरारोज अनिवार्य आहे.  प्रत्येक धांद्यामध्ये आज कॉम्पिटिशन वाढलेली दिसेल. शहरात एकही छत्री लागत नव्हती तेव्हापासून चौकात बसून हा धंदा वाढवला. ऊन वारा पाऊस हे न पाहता रस्त्यावर बसून काम करायचो; तेव्हा येणारे जाणारे ओळखी अनोळखीचे लोकं आश्चर्याने बघायची. असाही एखादा धंदा असतो यावर त्यांचा विश्वास बसायचा नाही. रिकामी फिरस्ती पोरं माझ्याजवळ यायची आणि कामाविषयी साविस्तर विचारायची; तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मी सर्व काही सविस्तर सांगायचो. आणि तुम्ही पण हा व्यवसाय सुरू करा, असा फुकटचा सल्ला द्यायचो. आज तीच पोरं माझ्या नाकावर टिच्चून महीना ३० ते ३५ हजार रु कमावताना दिसतात. असो, परंतु आपल्यामुळे बऱ्याच लोकांचे परिवार जागेवर आले. त्यांची रोजीरोटी सुरळीत झाली याच काहीस समाधानही आहे. एक गोष्ट तितकीच खरी आहे की जेंव्हा एखाद्याचा वाईट काळ सुरू असतो तेव्ह...

बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

 येत्या दोन दिवसांत सुरु होत असलेले हिवाळी अधिवेशन तसेच दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मराठा, ओबीसी, धनगर समाजाचे आरक्षण मागणी अनुषगांने आंदोलने चालू आहेत. दि. 16 डिसेंबर 2024 पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. तसेच आगामी कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने होण्याची शक्यता असून अचानक घडणाऱ्या घटनांवरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरक्षणच्या मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहेत. या करिता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे. दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजीचे 00.01 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत बीड जिल्हयात या कालावधीत महाराष्ट्...

मस्साजोग येथील क्रूर हत्याकांडाच्या निषेधार्थ बीड जिल्हा कडकडीत बंद ...

 बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील लोकनियुक्त सरपंच कै . संतोष देशमुख यांची दिनांक ०९/१२/२०२४ रोजी अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली . या घटनेला बराच काळ उलटून गेला तरी मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत .  मागील काही महिन्यापासूनची बीडची परिस्थिती पाहिली तर  तेथे खंडणीसाठी व्यापारी व व गुत्तेदारांच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आहे . शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जात आहे . कायदा व सुव्यवस्था अडचणीत आली आहे . अशा घटना पाहता बीडचा बिहार झालाय काय की अशी भावना बीड व परिसरातील लोकांची झाली आहे . बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस , व्यापारी , अधिकारी आज दडपणाखाली जीवन जगत आहेत तेथील सर्वसामान्य माणसांना , व्यापाऱ्यांना , गुत्तेदारांना व अधिकाऱ्यांना भयमुक्त करायचा असेल .  तर महाराष्ट्र सरकारने असे गुन्हे करणारे आरोपी व त्यांना पाठीशी घालून सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी व स्थानिक पोलीस प्रशासन याची सखोल चौकशी करून दोषींवर   कडक कार्यवाही करावी . अशी मागणी सकल मराठा समाज व बीड जिल्ह्यातील समस्त जनता यांच्या वतीने आज करण्यात आली आहे . या घटनेच्या निषेधार्थ पूर्ण बीड...

माझी आमदार माननिय श्री पृथ्वीराज साठे साहेब निसटत्या पराभवाचा दिलदार पणे स्वीकार करुन आभार दौरे करतात परंतु हे विजयी दौरे ठरले असले.

 माझी आमदार मा. श्री पृथ्वीराज साठे साहेब यांचा थोडक्यात निसटता पराभव हा १,१४,३९४ लोकांच्या जिव्हारी लागून गेला. ते केज विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटाकडून रिंगणात होते. भाजप कडून मा. नामिता ताई मुंदडा या १,१७,०८७ मतदान घेऊन अवघ्या २६८७ मतांनी विजयी ठरल्या. पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई केज आणि नेकनूर येथे जंगी सभा गजवण्यात आल्या. या तुलनेत भाजपच्या खुप कमी सभा झाल्या. निवडणुकीचा अगोदरचा काळ पहिला तर असे लक्षात येईल की जनमानसात चर्चेचा विषय होत होता की लोकसभा निवडणुकीत जसे प्रस्थापित लोकांना पाडले गेले. बदल हवा आहे म्हणुन प्रस्थापित उमेदवारांना हार पत्करावी लागली. तसे विधानसभा निवडणुकीतही होईल आणि विद्यमान आमदारापेक्ष्या पर्यायी उमेदवाराला निवडून दिले जाईल. परंतु तसे झाले नाही. याचे अनेक कारणे समोर आलेली आहेत.  साठे समर्थक आणि चहू बाजूंनी मिळणारे पाठिंबे यांचा एवढा भडिमार झाला की आपला विजय कोणीच रोखू शकणार नाही अशी एक भावना निर्माण झाली. त्यामूळे आत्ता आपल्याला वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही असे गृहीत धरून अंतर्गत यंत्रणा का...