मस्साजोग येथील क्रूर हत्याकांडाच्या निषेधार्थ बीड जिल्हा कडकडीत बंद ...

 बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील लोकनियुक्त सरपंच कै . संतोष देशमुख यांची दिनांक ०९/१२/२०२४ रोजी अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली . या घटनेला बराच काळ उलटून गेला तरी मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत . 

मागील काही महिन्यापासूनची बीडची परिस्थिती पाहिली तर 

तेथे खंडणीसाठी व्यापारी व व गुत्तेदारांच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आहे . शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जात आहे .

कायदा व सुव्यवस्था अडचणीत आली आहे .

अशा घटना पाहता बीडचा बिहार झालाय काय की अशी भावना बीड व परिसरातील लोकांची झाली आहे .


बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस , व्यापारी , अधिकारी आज दडपणाखाली जीवन जगत आहेत तेथील सर्वसामान्य माणसांना , व्यापाऱ्यांना , गुत्तेदारांना व अधिकाऱ्यांना भयमुक्त करायचा असेल . 

तर महाराष्ट्र सरकारने असे गुन्हे करणारे आरोपी व त्यांना पाठीशी घालून सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी व स्थानिक पोलीस प्रशासन याची सखोल चौकशी करून दोषींवर 

 कडक कार्यवाही करावी .

अशी मागणी सकल मराठा समाज व बीड जिल्ह्यातील समस्त जनता यांच्या वतीने आज करण्यात आली आहे .

या घटनेच्या निषेधार्थ पूर्ण बीड जिल्हा उदया दिनांक १३/१२/२०२४ ला बंद राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

मद्यधुंद कंटेनर ड्रायव्हरचा केज शहरात धुमाकुळ! चिरडून महिला जागीच ठार. अनेकजण जखमी

केज शहर अपघातमुक्त होणार का?