माझी आमदार माननिय श्री पृथ्वीराज साठे साहेब निसटत्या पराभवाचा दिलदार पणे स्वीकार करुन आभार दौरे करतात परंतु हे विजयी दौरे ठरले असले.
माझी आमदार मा. श्री पृथ्वीराज साठे साहेब यांचा थोडक्यात निसटता पराभव हा १,१४,३९४ लोकांच्या जिव्हारी लागून गेला. ते केज विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटाकडून रिंगणात होते. भाजप कडून मा. नामिता ताई मुंदडा या १,१७,०८७ मतदान घेऊन अवघ्या २६८७ मतांनी विजयी ठरल्या.
पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई केज आणि नेकनूर येथे जंगी सभा गजवण्यात आल्या. या तुलनेत भाजपच्या खुप कमी सभा झाल्या. निवडणुकीचा अगोदरचा काळ पहिला तर असे लक्षात येईल की जनमानसात चर्चेचा विषय होत होता की लोकसभा निवडणुकीत जसे प्रस्थापित लोकांना पाडले गेले. बदल हवा आहे म्हणुन प्रस्थापित उमेदवारांना हार पत्करावी लागली. तसे विधानसभा निवडणुकीतही होईल आणि विद्यमान आमदारापेक्ष्या पर्यायी उमेदवाराला निवडून दिले जाईल. परंतु तसे झाले नाही. याचे अनेक कारणे समोर आलेली आहेत.
साठे समर्थक आणि चहू बाजूंनी मिळणारे पाठिंबे यांचा एवढा भडिमार झाला की आपला विजय कोणीच रोखू शकणार नाही अशी एक भावना निर्माण झाली. त्यामूळे आत्ता आपल्याला वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही असे गृहीत धरून अंतर्गत यंत्रणा काम करू लागली.
लोकसभा निवडणुकी प्रमाणे याही वेळेला जारांगे फॅक्टर काम करेल. पूर्ण मराठा मुस्लिम दलित आणि भटक्या विमुक्त जातींची मते आपल्याच पदरात पडणार त्यामूळे त्यांना विचारत घेणे किंवा वेगळे आमिष दाखवणे गरजेचे नाही. अशीही बाजू समोर आली.
उमेदवार गरीब आहे. पार्टीने त्यांना दत्तक घेतले आहे. अशी विधाने मोठ मोठ्या स्टेज वरून होत होती. अनेक शेतकऱ्यांनी व जनसामान्य व्यक्तींनी वर्गणी गोळा करून त्यांच्याकडे दिली. दुसरीकडे तुमचा उमेदवार गरीब असला तरी पार्टी गरीब नाही अशीही चर्चा रंगात आली होती.
लोकांना प्रतिनिधी च्या वयक्तिक आयुष्याशी काही देणे घेणे नसते. तो सक्षम निर्भिड धाडशी आणि वेळेला धावणारा असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते. आपली कमजोर बाजू पुढे करून कुणाचेही भले झालेले नाही ही साधी गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नसेल काय.
केज मतदार संघातील बरेच मतदाते कामानिमित्त दुसऱ्या राज्यात ऊसतोड कामगार, बेगारी कामगार, पुणे मुंबई या शहरात काम करण्यासाठी म्हणुन स्थलांतर करतात. उपजीविकेचे साधन जागेवर उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ येते. अश्या मतदारांना मतदान बूथ वर आणण्यात साठे यंत्रणा सपशेल अपयशी ठरली अशी उघड चर्चा होताना दिसते.
केज विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गट आणि भाजप च्या नमिता ताई मुंदडा यांच्यात वन टू वन फाईट चालेल असे वाटत होते. एकूण २५ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांची मतदान मिळवल्याची आकडेवारी लक्षात आणून देते की त्यांच्यामुळे भाजप ला खुप मोठा फायदा झाला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला खुप मोठा फटका बसला. हा सर्व मतदान ध्रुवीकरणाचा खेळ साठे यांच्या लक्षात यायला पाहिजे होता.
कुठलाही खेळ मांडताना फिल्डींग लावणे खुप सगळ्यात महत्वाचे असते. साठे साहेबांच्या टीममध्ये प्रत्येक जण आपल्या मर्जी प्रमाणे खेळत होता. प्रत्येक खेळाडूला ( कार्यकर्त्याला ) ठरवून त्याची जबाबदारी दिलेला नव्हती. या खेळाचा लीडर मीच आहे पण माझ्या हातात काही नाही. असे प्रत्येक खेळाडू म्हणत होता. आणि ज्यांच्या हातात सर्व काही आहे ते खेळातच नाहित असे जाणीव पूर्वक भासवत होते. या सर्व प्रकरणात लोकांची धांदल उडाली आणि शेवटी त्यांनीच योग्य तो निकाल लावला.
या उलट मुंदडा कंपनी या खेळात माहिर असल्यामुळे त्यांनी अगोदरच फिल्डिंग लावून निवांत बसले. वेळेत प्रत्येकाने आपापले कार्य क्षेत्र सांभाळून चौकार षटकार बाजी केली आणि विजय सुद्धा मिळवला.
Comments
Post a Comment